हुक्केरी सार्वजनिक रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनातून काही वेळ काढत प्रजापिता ब्रम्हाकुमारी संस्थेच्या संचालकांच्या माध्यमातून ध्यान धारणा केली.

मंगळवारी सायंकाळी सार्वजनिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या रोजच्या आयुष्यातील काही काळ ध्यान धारणा करण्यासाठी काढला. बेळगाव प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाच्या वैद्यकीय विभागाच्या प्रमुख बी के संगीता आणि हुक्केरी येथील बी के चंपा यांच्या उपस्थितीत कोविड काळात सेवा बजाविलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. वैद्याधिकारी महांतेश नरसन्नवर, डॉ. आर. ए. मकानदार, डॉ. युनूस बालपरवेज, डॉ. ज्ञानेश, डॉ.. प्रगती बोरगावी आणि डॉ. विजयालक्ष्मी तंगडी यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ब्रह्मकुमारीप्रमाणेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी अध्यात्मिक ध्यानधारणा करत काही काळ मौन पाळले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बी के संगीता म्हणाल्या, कोविड काळात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद काम केले आहे. या काळात सेवा बजाविलेल्या सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांचा देशभरात प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयातर्फे सत्कार करण्यात येत आहे. आज हुक्केरी येथील सार्वजनिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. 
यावेळी बी के बाबू नाईक, शिवानंद झिरली, सुभाष नाईक, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे कुमार, कुमारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments