Belagavi

धर्मराज पतसंस्था आणि शिंदे कुटुंबीयांतर्फे हलगा ग्राम पंचायतीच्या नूतन अध्यक्षांचा सत्कार

Share

हलगा ग्रामपंचायतीवर अध्यक्षपदी निवडून आलेल्या सदानंद बसवंत बिळगोजी यांचा धर्मराज सहकारी पतसंस्था आणि शिंदे कुटुंबियांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

व्हॉइस : हलगा ग्रामपंचायतीवर अध्यक्षपदी निवड झालेल्या सदानंद बसवंत बिळगोजी यांचा यांचा धर्मराज सहकारी पतसंस्था आणि शिंदे कुटुंबियांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यापूर्वी उपाध्यक्षपदी कार्यरत असलेल्या बिळगोजी यांनी अनेक विकासकामे केली असून नुकतीच त्यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. (फ्लो)

यावेळी सत्काराला उत्तर देताना सदानंद बिळगोजी म्हणाले, ग्रामपंचायत अध्यक्षपदी निवड होण्यासाठी मला अनेकांचा पाठिंबा लाभला आहे. या साऱ्यांचे त्यांनी आभार मानले. गावच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्यातून आपण प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले. ()

धर्मराज संस्थेचे अध्यक्ष आणि हलगा गावचे नूतन अध्यक्ष सदानंद बसवंत बिळगोजी यांच्या निवडीनंतर ग्रामस्थांकडून अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Tags: