Chikkodi

उमराणीत अवाढव्य गव्याचे दर्शन झाल्याने भीती

Share

चिक्कोडी तालुक्यातील उमराणी गावात काल सायंकाळी अवाढव्य गवारेडा नजरेस पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

होय, उमराणी गावच्या होनलू टेकडीजवळील बाळाप्पा बन्नवर आणि बसू मांजे यांच्या शेतात काल संध्याकाळी गवारेडा चरताना दिसून आला. याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात धाव घेत तळ ठोकूनही गवारेड्याला पकडण्यास टाळाटाळ चालवली आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आणि आम्हाला व आमच्या गवारेड्याने मारल्यावरच तुम्ही त्याला पकडणार का?’ असा सवाल करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी उसात लपून फटाके उडवत गव्याला जंगलात पिटाळण्याचा प्रयत्न केला. मात्र उमराणी गावातील दिवटे यांच्या शेतात आजही त्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांत पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या अवाढव्य आकाराच्या गव्याला पकडून जंगलात सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी महसूल, कृषी, फलोत्पादन आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

Tags: