Belagavi

देसूरमध्ये १२ लाख रुपयांच्या ९०० पोती खताची चोरी

Share

बेळगाव तालुक्यातील देसूर येथील रेल्वेस्थानकाजवळील गोडाऊनमधून प्रत्येकी ५० किलो वजनाच्या खताच्या तब्बल ९०० पोत्यांची चोरी झाली आहे. १२ लाख रुपये किंमतीच्या या खताच्या चोरीमुळे खळबळ माजली आहे.

होय, देसूर येथील रेल्वेस्थानकाजवळील गोडाऊनमधून ९०० पोती खताची रहस्यमयरित्या चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. देसूर येथील रेल्वेस्थानकाजवळ आरसीएफचे डीएपीचे गोडाऊन आहे. तेथे ही खत चोरीची घटना घडली आहे. एखाद्या माहितगाराचाच यात हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी गोडाऊनचे मॅनेजर शिवाजी जाधव यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरांच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांनी जाळे विणले आहे.

 

 

 

Tags: