केएसआरपी पोलीस दल हा शिस्तबद्ध विभाग आहे. पोलीस विभागात कार्य करताना प्रत्येकाने दक्षतेने काम करण्याची आवश्यकता आहे, असे मत पोलीस महासंचालक आर हितेंद्र यांनी व्यक्त केले.

मंगळवारी कंग्राळी येथील केएसआरपी मैदानात पोलीस कॉन्स्टेबल शपथविधी सोहळ्यात ते बोलत होते. पोलीस विभाग हा इतर विभागांप्रमाणे नाही. पोलीस विभाग हा अत्यंत शिस्तप्रिय विभाग आहे. अनेकांचे सरकारी नोकरीत रुजू होण्याचे स्वप्न असते. मात्र पोलीस विभागात रुजू होणे हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पोलीस विभागात कर्त्यव्य बजाविताना जाती, धर्म, पंथ या गोष्टी आड येता कामा नयेत. सर्वांसाठी समान पद्धतीने काम करणे आवश्यक आहे, असा कानमंत्रही एडीजीपी हितेंद्र यांनी दिला. के एस आर पी हा पोलीस विभागातील महत्वाचा घटक आहे. पाच वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर वयोमानानुसार पीएसआय पदी बढतीही मिळू शकते. के एस आर पी कर्मचाऱ्यांना पोलीस विभागाकडून अनेक सुविधाही दिल्या जातात याचा प्रत्येकाने सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन एडीजीपी हितेंद्र यांनी केले. पोलीस विभागात कार्यरत असताना गरुडाची नजर ठेवून कार्य करावे, असे एडीजीपी हितेंद्र म्हणाले. या सोहळ्यात के एस आर पी प्रशिक्षणादरम्यान आयोजित केलेल्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.

या कार्यक्रमाला आयजीपी कुमार, शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, डीसीपी पी व्ही स्नेहा, रवींद्र गडादि, बेळगाव के एस आर पी प्रशिक्षण शाळेचे प्राचार्य रमेश बोरगाव, के एस आर पी शेगावी १० व्यय प्रशिक्षण शाळेचे प्राचार्य टी सुंदर राज आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments