बैलहोंगल तालुक्यातील नेसर्गी–मल्लापूर रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीची धडक बसल्याने मेंढपाळ महिला व बालक दोघे जागीच ठार झाले. अपघातात दुचाकीचालकही गंभीर जखमी झाला आहे.
होय, नेसर्गीजवळील मल्लापूर अंकलगी रस्त्यावर ५९ वर्षीय महिला भीमव्वा बेळवडी आणि १३ वर्षीय बालक इरनगौडा गडेन्नावर हे बकरी चारत होते. यावेळी भरधाव वेगाने दुचाकी चालवत आलेल्या चालकाने अत्यंत वेगाने येत या दोघांना ठोकरले. त्यामुळे हे दोघे उडून पडून जागीच ठार झाले. सुदैवाने एकजण या दुर्घटनेत बचावला. अपघातात दुचाकीचालकही गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती कळताच ग्रामस्थांनी येथे मोठी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन या दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बेळगाव जिल्हा इस्पितळाला पाठवून दिले. अपघातात मरण पावलेल्या भीमव्वा बेळवडी यांचा मुलगा अडिवेप्पा याने अपघाताची माहिती देताना सांगितले की, माझी आई भीमव्वा बेळवडी आणि इरनगौडा बकऱ्या चारून झाल्यावर त्यांना पाणी पाजत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांना ठोकरले. त्यामुळे हे दोघे जागीच ठार झाले. या अपघाताची पोलिसात नोंद झाली आहे. या अपघातात दुचाकीचालकही गंभीर जखमी झाला आहे.
एकंदर, दुचाकीचालकाच्या वेगाच्या हव्यासापोटी दोघा निष्पापांना प्राण गमवावे लागले आहेत. शिवाय या अपघातात दुचाकीचालकही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.


Recent Comments