Belagavi

सप्तसागर सरकारी हायस्कूलचा निकाल १००%

Share

मार्चएप्रिलमध्ये झालेल्या एसएसएलसी परीक्षेत अथणी येथील सप्तसागर सरकारी हायस्कूलचा निकाल १००% लागल्याची माहिती मुख्याध्यापक सी. के. लमानी यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना ही माहिती देऊन मुख्याध्यापक सी. के. लमानी म्हणाले, शाळेच्या प्रिया कांबळे या विद्यार्थिनीने सप्तसागर सरकारी हायस्कूलमध्ये ६२५ पैकी ५९० गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. लक्ष्मी बाळेकायी हिने ६२५ पैकी ५७५ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला आहे. हिंदी विषयात ४ तर  समाजविज्ञान विषयात २ विध्यार्थ्यानी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. या प्रतिभावान विध्यार्थ्यानी शाळेचे आणि सप्तसागर गावाचे नाव उंचावले आहे.

विध्यार्थ्यांच्या या यशात शाळेतील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे योगदान असल्याचे मुख्याध्यापक सी. के. लमानी यांनी सांगितले.

Tags: