कुणाकडे जास्त आणि चांगली शक्ती आहे त्यांना वस्तू वाटप करून जिंकण्याची गरज नाही. लापटॉप वितरण करून विजय मिळवता येत नाही, असा टोला काँग्रेसला लगावत भाजप जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संजय पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या आरोप केलाय.

बेळगावमध्ये या विषयावरून संजय पाटील यांनी नवीन गौप्यस्फोट केलाय. आमच्या उमेदवारांची कामगिरी उत्तम नसल्याचे सांगून लॅपटॉप वितरण करण्याची गरजच काय? ज्यांच्यात शक्ती आहे त्यांना अशा वस्तू वितरित करण्याची गरजच भासू नये. असे संजय पाटील म्हणाले. लॅपटॉप वितरण कुणी केले असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी उपस्थित केल्यावर अशा गोष्टी आपल्या कानी पडल्याचे संजय पाटील यांनी सांगितले.
२६ मे रोजी पदवीधर मतदार संघाचे हनुमंत निराणी, शिक्षक मतदार संगःचे अरुण शहापूर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत. यावेळी भाजप राज्याध्यक्ष सुनीलकुमार कटील, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, मुख्यमंत्री बोम्मई हेदेखील उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन करण्यात येणार नाही. आणि काँग्रेस काय करणार आहे हे आपल्याला माहित नाही, भाजप हा पक्ष वेगळाच असल्याचे संजय पाटील म्हणाले.


Recent Comments