विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील देवर निंबरगी गावात रविवारी रात्री साखळी चोऱ्या झाल्याची घडली.

चोरट्यांनी राजू पत्तार यांच्या दुकानावर डल्ला मारून अंदाजे ४० हजार रोख रक्कम आणि सुमारे ५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला आहे. सदाशिव सिंगे यांच्या घरातील तिजोरीचे कुलूप तोडून ८ हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. त्यानंतर झाकीर नामक व्यापाऱ्याच्या दुकानात तिजोरीचे कुलूप फोडून रोख रक्कम घेऊन पलायन केल्याची घटना घडली. चडचण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


Recent Comments