Belagavi

स्मार्टनेस योजनेत नियमबाह्य पद्धतीने निविदा प्रक्रिया-चौकशी साठी ‘करवे’ची मागणी

Share

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्मार्टनेस योजनेसाठी निविदा मागविण्यात आल्या असून या निविदा प्रक्रियेत नियम पायदळी तुडविण्यात आल्याचा आरोप करत करवेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

बेळगाव शहरात सुरू असलेल्या स्मार्टसिटी योजनेअंतर्गत स्मार्टनेस नावाचा एक प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पांतर्गत सर्व शाळांना सिलॅबस इनबिल्ट प्रोजेक्ट देण्यात येत आहे. हे प्रोजेक्ट बसवणाऱ्या कंपनीविरोधात पेटंट चोरी केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात न्यायालयात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. परंतु या प्रोजेक्ट अंतर्गत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत याचा तपास आणि चौकशी करण्यासाठी आज करवेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना करवे जिल्हाध्यक्ष अभिलाष म्हणाले, नियम पायदळी तुडवून निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. प्रोजेक्टर बसविण्याचे काम करणाऱ्या कंपनीवर आधीच तक्रार आहे. परंतु नियमबाह्य पद्धतीने निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. हि बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन सदर प्रकारची चौकशी करण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी कर्नाटक रक्षण वेदिका बेळगाव जिल्हा घटकचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Tags: