Belagavi

संतीबस्तवाड मधील विद्यार्थिनीचे दहावी परीक्षेत यश

Share

आई अंगणवाडी कार्यकर्ती आणि वडील शेतकरी.. यांच्या मुलीने दहावी परीक्षेत अत्युत्तम कामगिरी करत ९९.३६ गुण मिळविले आहेत.

संतीबस्तवाड मधील शेतकरी कुटुंबातील सृष्टी नागेंद्र सिद्दण्णावर असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. दहावी परीक्षेत आपले लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थिनीने ९९.३६ टक्के गुण मिळवत शाळेत दुसऱ्या क्रमांकावर येण्याचा बहुमान मिळविला आहे.

सृष्टीच्या आईचा बालविवाह झाला होता. दहावी संपल्यानंतर ताबडतोब सृष्टीच्या आईचा विवाह झाला. शिक्षणाची आवड आणि स्वप्न बाळगणाऱ्या सृष्टीच्या आईला पुढील शिक्षण घेणे शक्य झाले नाही. मात्र सरकारी नोकरी करत जनसेवा करण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी निर्णय घेतला. आपल्या मुलीने मात्र उच्चशिक्षण घेऊन मोठ्या पदावर कार्य करावे अशी त्यांची इच्छा आहे.

सृष्टीला मात्र आपल्या भविष्यात डॉक्टरेट करण्याची इच्छा आहे. एमबीबीएस अभ्यासक्रम शिकून गरीब जनतेच्या सेवेसाठी आपण कार्य करावे, अशी तिची इच्छा आहे.

Tags: