Chikkodi

यमगर्णीत ढाब्यात सिलेंडरच्या स्फोटात ५ जखमी; दोघे गंभीर

Share

 स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही दुर्घटना पुणेबेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्र. शेजारील निपाणीजवळील यमगर्णी येथे ढाब्यावर घडली

होय, बेळगाव जिल्ह्यातील निपाणीजवळील यमगर्णी गावात महामार्गालगत असलेल्या एका ढाब्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. स्फोटात ढाबा मालक याकूब मोहम्मद कडीवाल, ढाब्यातील कामगार मुस्तफा आलम, मोहम्मद आजाद हासन, इक्रमुल आणि अन्वर मोहम्मद हे ५ जण जखमी झाले.

यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. जखमींवर कोल्हापुरातील खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी निपाणी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

 

Tags: