कर्नाटक बोर्डाचे दहावी परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून या परीक्षेत अथणी तालुक्यात अक्षता दाबोळी हिने तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे.

कर्नाटक पब्लिक स्कुल नदी इंगळगाव माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी कुमारी अक्षता निंगाप्पा दाबोळी हिने दहावी परीक्षेत ६२५ पैकी ६२३ गुण घेत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. कन्नड विषयात १२५, इंग्रजी ९८ तर इतर सर्व विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत अक्षताने प्रथम क्रमांक मिळविला आहे. अक्षताने मिळविलेल्या या यशाबद्दल शालेय शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. 
आपल्या यशाबद्दल अक्षता दाबोळी हिने प्रतिक्रिया देताना आपल्या यशाचे श्रेय हे आपल्या शिक्षकांचे आणि पालकांचे असल्याचे सांगितले. शिक्षक आणि पालकांचे उत्तम मार्गदर्शन, प्रोत्साहन यामुळे आपण हे यश मिळवू शकलो, आपल्या या यशात आपल्या संपूर्ण कुटुंबाचे मोलाचे मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाला, असे मत तिने व्यक्त केले. दहावीनंतर आपण पुढील शिक्षण देखील अशाचपद्धतीने पूर्ण करणार असून आपण डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत असल्याचे अक्षताने सांगितले.
अक्षताने मिळविलेल्या या यशाबद्दल शालेय शिक्षक, कर्मचारी, मित्र मैत्रिणी, पालकांनी मिठाई भरवून अक्षतांचे अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपली मराठीसाठी, राकेश मैगुर, इन न्यूज नेटवर्क, अथणी


Recent Comments