वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला भाजपच्या चार आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे भाजपच्या वर्तुळात खळबळ माजली आहे.

होय, बेळगाव जिल्हा भाजपमधील गटातटाच्या राजकारणाला ब्रेक लावण्यासाठी भाजप नेतृत्वाने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आज बेळगाव येथील एका खासगी हॉटेलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
यावेळी मंत्री गोविंद कारजोळ, उमेश कत्ती, शशिकला जोल्ले, खासदार मंगल अंगडी व अण्णा साहेब जोल्ले, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, आ. भालचंद्र जारकीहोळी, आनंद मामनी, अनिल बेनके, महादेवप्पा यादवाड, श्रीमंत पाटील, महेश कुमठळ्ळी, महांतेश दौडगौडर, राज्य भाजप उपाध्यक्ष लक्ष्मण सवदी आदी उपस्थित होते. मात्र रमेश जारकीहोळी, अभय पाटील, पी. राजीव आणि दुर्योधन ऐहोळे या ४ आमदारांनी या बैठकीला चक्क दांडी मारली. रमेश जारकीहोळी यांच्या अनुपस्थितीमुळे जिल्हा भाजपमध्ये अद्यापही गटातटाचे राजकारण सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.



Recent Comments