बेळगावमधील कसबेकर-मेटगुड्ड हॉस्पिटलच्या वतीने सांबारा आणि बाळेकुंद्री खुर्द गावात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सांबारा ग्रामपंचायतीमद्ये झालेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ७० हुन अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. तसेच बाळेकुंद्री येथे झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरात ८० हुन अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.

यावेळी मोफत औषधोपचार, मोफत फिजिओथेरपी, मधुमेह, रक्तदाब चाचणी करण्यात आली. या आरोग्य तपासणी शिबिरात मुलगा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हेमलता बीएच, स्वरूपा मेटगुड्ड, डॉ. कार्तिक, रूपा तळवार, आनंद चिकलि आदींसह मेटगुड कसबेकर रुग्णालयाचे डॉक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि परिचारिका उपस्थित होत्या.


Recent Comments