Belagavi

बेंडीगिरी येथे रायन्ना मूर्तीवर दगडफेक ; तणावपूर्ण वातावरण

Share

क्रांतिवीर संगोळी रायन्ना मूर्तीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना बेंडीगिरी येथे घडली आहे. या घटनेनंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.

आज दुपारी बेंडीगिरी गावात हि घटना घडली आहे. दगडफेकीनंतर समाजकंटक फरारी झाले असून दगडेफ़कीनंतर क्रांतिवीर संगोळी रायन्ना पुतळ्याच्या पायाला दुखापत झाली आहे. हि घटना समजताच रायन्ना समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बेंडीगिरी गावाला हिरेबागेवाडी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. दगडेफ़क करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी रायन्ना समर्थक आणि ग्रामस्थांनी केली आहे.

या घटनेनंतर बेंडीगेरी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून देशासाठी बलिदान देणाऱ्या योध्यांबाबत अशी कृत्ये करणाऱ्यांना तातडीने अटक करून शिक्षा करावी अशी मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: