: भाजपच्या सिद्धांतांशी, विचारसरणीशी मी सहमत असल्याने भाजपमध्ये प्रवेश केला असून आगामी काळात संपूर्ण उत्तर कर्नाटक बळकट करण्यासाठी आपण पक्षासाठी काम करणार असल्याचे माजी विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी म्हणाले.

हुळबळी येथे भाजप कार्यालयाला पहिल्यांदाच भेट दिल्यानंतर बसवराज होरट्टी यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना होरट्टी म्हणाले, आपल्याला भाजपात प्रवेश करण्यासाठी अनेक नेत्यांकडून आवाहन करण्यात आले. काहींनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला. मात्र आपण भाजप विचारसरणीशी सहमत असल्याने भाजप प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकाच्या इतिहासात प्रथम सभापतींनी राजीनामा दिल्याची घटना घडली आहे. अनेक पक्षांसोबत आपण आजपर्यंत काम केले असून रामकृष्ण हेगडे यांच्यासोबत अखेरपर्यंत आपण राहिलो. अनेक राजकीय नेत्यांशी आपले चांगले संबंध आहे. प्रत्येक ठिकाणी मी निर्दोषपणे काम केले आहे. सर्वांचे मार्गदर्शन घेऊन पक्ष संघटनेसाठी प्रयत्न करण्यात असल्याचे होरट्टी म्हणाले.
२३, २४ मे दरम्यान संपूर्ण कुटुंबासमवेत आपण उमेदवारी अर्ज भरणार असून २६ मे रोजी भाजप नेते, कार्यकर्ते आणि जनतेसमवेत उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारांच्या भावना लक्षात घेऊन पुढे वाटचाल करणार असून जेडीएस सोडण्यामागे विशेष असे काही कारण नसल्याचे होरट्टी म्हणाले. भाजपमधून निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला जात होता. पक्षापेक्षाही अनेक शिक्षकांशी आपले आत्मीयतेने संबंध असून जेडीएसमधूनच आपण मोठे झाले, यावर कोणतीही टीका करणे योग्य नसल्याचे मत होरट्टी यांनी व्यक्त केले. ()
यावेळी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले कि, बसवराज होरट्टी यांनी भाजपात प्रवेश घेतल्यामुळे भाजपाला हत्तीचे बळ मिळाले आहे, जेडीएसमधून यापूर्वी अनेक नेत्यांनी भाजप प्रवेश केला आहे. २००८ साली बसवराज होरट्टी यांना येडियुरप्पांनी भाजपात प्रवेश करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यावेळी जेडीएस शी त्यांचे संबंध चांगले असल्याने हे शक्य झाले नाही. बसवराज होरट्टी यांचे अनेक समर्थक आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाच्या शक्तीत आणखीन वाढ झाल्याचे मत शेट्टर यांनी व्यक्त केले. ()
यावेळी भाजप राज्य प्रधान सचिव महेश टेंगिनकाई, धारवाड जिल्हाध्यक्ष संजय कटपकर, विधान परिषदेचे सदस्य प्रदीप शेट्टर आदींसह अनेक नेते, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments