वायव्य पदवीधर मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. भाजपचे उमेदवार हनुमंत निरानी यांनी आज या निवडणुकीसाठी आपला सांकेतिक उमेदवारी अर्ज दाखल केला.

वायव्य पदवीधर मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हनुमंत निरानी यांनी आज आपला सांकेतिक उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. हनुमंत निरानी याआधी एमएलसी होते. आता दुसऱ्यांदा ते ही निवडणूक लढवत आहेत. विशिष्ट मुहूर्तावर आज त्यांनी उमेदवारी अर्जाचे २ सेट सादर केले. यावेळी त्यांच्या समवेत राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी पक्ष नेते आर. एस. मुतालिक-देसाई आदी उपस्थित होते.
अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना हनुमंत निरानी म्हणाले, वायव्य मतदार संघातील निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल केला आहे. भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने भाजपचा अधिकृत उमेदवार म्हणून विशिष्ट मुहूर्तावर सांकेतिक अर्ज दाखल केला आहे. सर्व नेते आणि कार्यकर्त्यांसमवेत २६ मे रोजी पुन्हा अर्ज भरणार आहे. पक्षनेत्यांनी मला दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन संधी दिली आहे. मतदारसंघात दौरा करून प्रचार करून सर्वांचा विश्वास आणि प्रेम जिंकेन असा विश्वास आहे. सर्वांच्या आशीर्वादामुळे यावेळीसुद्धा ही निवडणूक बहुमतांनी जिंकेन असा विश्वास निरानी यांनी व्यक्त केला.


Recent Comments