वीरशैव आणि लिंगायत या दोन्ही शब्दांवरून वाद निर्माण करण्याचे काम सुरु आहे, यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप इराण्णा कडाडी यांनी केलाय.

लिंगायत आणि वीरशैव हे दोन्ही वेगवेगळे समाज असल्याची चर्चा होत असून यावरून वाद सुरु आहे. वीरशैव आणि लिंगायत या मुद्द्यावरून वाद करू नये. कर्नाटकात अनेक शिक्षण संस्था, मठ, स्थापनेत मोठा त्याग दिला आहे. याबद्दल अधिक चर्चा न करता समाजातील ज्येष्ठांशी चर्चा करून या विषयावर निर्णय घ्यावा, असे मत इराण्णा कडाडी यांनी व्यक्त केले.
लिंगायत समाजाच्या नेत्यांनी या विषयावर विविध मते व्यक्त न करता चर्चा करून हा प्रश्न सोडवावा. समाजाची दिशाभूल करू नये. प्रसारमाध्यमांसमोर एक, रस्त्यावर एक चर्चा करून समाजात गोंधळ निर्माण करू नये, समाजातील नेत्यांनी एकत्र येऊन समाजासाठी काय योग्य आहे याचा विचार करावा, असे आवाहन कडाडी यांनी केले.
वीरशैव, लिंगायत समाज हा हिंदू धर्मचाच भाग आहे कि नाही? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनि उपस्थित केल्यानंतर प्रतिक्रिया देताना कडाडी म्हणाले, आपण सारेजण हिंदू आहोत. जाती व्यवस्था जेव्हा अस्तित्वात आली त्यावेळी विविध पूजाविधी, सण, आचार विचार यात बदल होत गेले, आणि यानुसार धर्म निर्माण झाले असे मत त्यांनी व्यक्त केले.
लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याचे विधान तोंटद श्रींनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना इराण्णा कडाडी म्हणाले, धर्म आणि जात या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यानुसार प्रत्येक जाती धर्माच्या पद्धती वेगळ्या आहेत. परंतु आम्ही सर्व हिंदूच असल्याचे मत इराण्णा कडाडी यांनी व्यक्त केले.
लिंगायत समाजाचे एकीकडे आंदोलन सुरु आहे. परंतु या समाजातील विविध पंथामध्ये मतभेद दिसून येत आहेत. वीरशैव आणि लिंगायत या दोन्ही मुद्द्यावर लिंगायत समाजात गोंधळ निर्माण झाला असून या मुद्द्यावरून गोंधळ निर्माण न करता समाजातील ज्येष्ठांशी चर्चा करून हा मुद्दा सोडवावा, अशी प्रतिक्रिया इराण्णा कडाडी यांनी व्यक्त केली.


Recent Comments