मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बंगळुरूमधील केआर पुर विधानसभा मतदारसंघातील पावसामुळे प्रभावित झालेल्या विविध भागांना भेट देऊन पाहणी केली.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज शुक्रवारी बंगळुरूमधील केआर पुरा विधानसभा मतदारसंघातील पावसामुळे नुकसान झालेल्या राममूर्ती नगरातील नागप्पा पार्कसह विविध भागांना भेट देऊन पाहणी केली. सिटी राऊंड अप घेत मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या. फ्लो
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, केआर पुर मतदार संघात हेब्बाळ नाल्याचे पाणी येलहंका आणि हेब्बाळ येथे मोठ्या प्रमाणात पाणी वाहुन येत आहे. त्याची काल व आज पाहणी केली आहे. येथे दुरुस्ती व अन्य कामांसाठी 42 कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. येत्या फेब्रुवारीपर्यंत ही कामे पूर्ण केली जातील. या भागात नाले खूपच अरुंद झाले आहेत.
मोठा पाऊस झाल्यास पाणी वाहून जाणे कठीण होऊ शकते. त्यामुळे या भागात मोठे नाले तयार करण्यासाठी आम्ही आधीच पावले उचलली आहेत. येत्या काही दिवसांत 800 मीटरचा अतिरिक्त नाला बांधून पाणी सुरळीतपणे वाहून जाईल अशी व्यवस्था करण्यात येईल. मी अधिकाऱ्यांना पूर आल्यावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
8 विभागात टास्क फोर्स स्थापन करून सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत असे मुख्यमंत्र्यानी सांगितले. नगरविकास मंत्री बैरती बसवराज, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राकेश सिंह आदी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments