Banglore

बेंगळुरूमधील कालव्यांच्या सुधारणेसाठी १६०० कोटी रुपये

Share

: बंगळूरमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली अवस्था सुधारण्यासाठी राजकालव्याचा विकास महत्वाचा आहे. सर्व कालवे नीट करण्यासाठी १६०० कोटी रुपयांचा खर्च होणार असून यासही डीपीआर तयार करून तातडीने कामाची सुरुवात करण्यात येईल, बेंगळूर शहराचे रिस्ट्रक्चर होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले.

बेंगळुरू मध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काळ मुख्यमंत्र्यांनी शहराची पाहणी केली. सिटी राउंड दरम्यान बीएमटीसी बसमधून मंत्री, अधिकाऱ्यांसह महालक्ष्मी लेआऊट विधानसभा मतदार संघातील जेसी नगर परिसरात भेट देऊन पाहणी केली. यावेळी पुरात अडकलेल्या पूरग्रस्तांना आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले , अत्यंत कमी वेळेत पावसाचे प्रमाण अधिक झाले आहे गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदाच अशा पद्धतीने पाऊस पडला आहे ,यामुळे जनतेला अडचणी निर्माण झाल्या आहेत. मे महिन्यात पंधरा दिवस आधीच पाऊस आल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. या परिसरात असलेल्या राज कालव्या सह इतर कालव्यांच्या सुधारणेसाठी एक हजार 600 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून या संदर्भातील डीपीआर तातडीने तयार करून लवकरात लवकर कामकाज सुरू करण्यात येईल असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले हेबाळ एसटीपी 100 एलईडी इतके सामर्थ्य होते. परंतु आता यात 60 एलईडी घटक वाढविण्यात आले आहेत. महालक्ष्मी लेआउट परिसरातील घरांमध्ये शिरलेले पाणी पंप च्या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असून नुकसानग्रस्त घरांना 25 हजार रुपयांची भरपाई देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले

यावेळी महसूल मंत्री आर अशोक, व्ही सोमाण्णा, के गोपालय्या, आमदार के जे जॉर्ज, एस आर विश्वनाथ आदी उपस्थित होते.

Tags: