पंचपीठांपैकी एक काशीपीठाचे जगदगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य श्रींच्या पट्टाभिषेक सोहळ्यात सहभागी होऊन धन्य झाल्याची भावना कोचरीचे भक्त सूर्यकांत नाईक यांनी व्यक्त केली.

चिक्कोडी तालुक्यातील येडूर येथील श्री काडसिद्धेश्वर मठाच्या प्रांगणात पत्रकारांशी बोलताना सूर्यकांत नाईक यांनी ही माहिती देऊन सांगितले की, कोचरी आणि नणदी गावातून सुमारे ५० हुन अधिक भक्त उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी पिठाचे नवे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य श्रींच्या पट्टाभिषेक सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात अड्ड पालखी, कुंभमेळ्यासह अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले. 
आणखी एक भक्त गीतांजली धर्मूचे यांनी सांगितले की, काशी पिठाचे नवे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य श्रींच्या पट्टाभिषेक सोहळ्यात झालेल्या अड्ड पालखी, कुंभमेळ्यात कोचरी आणि नणदी गावातील महिलांनी सहभाग घेतला होता. या पत्रकार परिषदेला काडसिद्धेश्वर मठाचे व्यवस्थापक अडवय्या अरळीकट्टी यांच्यासह कोचरी आणि नणदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments