Belagavi

बेळगावात दुबई सिटी फॅमिली फन फेअरला चांगला प्रतिसाद

Share

 कुंदनगरी बेळगावात सुरू झालेल्या दुबई सिटी फॅमिली फन अँड फेअर एक्झिबिशनला बेळगावातील जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

होय, कुंदानगरी बेळगावातील लोक २-३ वर्षाच्या कोरोना काळात करमणुकीचे कोणतेही उपक्रम नसल्याने  कंटाळले होते. नुकताच कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे बेळगावातील लोकांचे मनोरंजन करण्यासाठी शहरातील सीपीएडी मैदानावर भव्य दुबई सिटी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

अनेक लोकांना दुबईला प्रत्यक्ष भेट देता येत नाही. त्यामुळे बेळगावातील सीपीएडी मैदानावर दुबईची दृश्ये दाखविणारे दुबईच्या धर्तीवर हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता वाजता सुरू होणाऱ्या या प्रदर्शनाचा कुंदानगरीतील लोक पूर्ण आनंद घेत आहेत. या प्रदर्शनात प्रवेश करताच आपण कोणत्या जगात आहोत असा प्रश्न पडून काही क्षण दंग होऊन जातो असे वातावरण निर्माण होते. दुबई शहरातील प्रतिष्ठित बुर्ज खलिफासह ट्विन टॉवर, हॉलीवूड युनिव्हर्सल ग्लोब आदी स्थळांच्या प्रतिकृती येथे अतिशय आकर्षक पद्धतीने साकारल्या आहेत.

या व्यतिरिक्त मुलांसाठी विविध खेळांचे कार्यक्रम आहेत. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे पार्क, फूड स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. सगळ्याच वयोगटातील नागरिकांसाठी फुल्ल एंजॉय करता येईल अशा व्यवस्थेची येथे रेलचेल आहे.

एकंदर दुबई सिटीची अनुभूती देणारे हे मस्त प्रदर्शन बेळगावात भरविण्यात आले आहे. येथे विविध वयोगटांच्या मनोरंजनासाठी सर्व प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. एकेवेळ कुंदानगरी बेळगावच्या लोकांनी या ठिकाणी भेट देऊन हा आनंद लुटण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

Tags: