बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील सत्तीगेरी गावची विद्यार्थिनी सहना महांतेश रायर या विद्यार्थिनीने एसएसएलसी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून दैदिप्यमान यश मिळवले आहे. तिने 625 पैकी 625 गुण मिळवून आईवडील, शाळेचे नाव उंचावले आहे.

होय, नुकत्याच झालेल्या एसएसएलसी परीक्षेचा निकाल आज गुरुवारी जाहीर करण्यात आला. यात बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने अपूर्व यश संपादन केले आहे.
सौंदत्ती तालुक्यातील सत्तीगेरी गावची विद्यार्थिनी सहना महांतेश रायर या विद्यार्थिनीने एसएसएलसी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून दैदिप्यमान यश मिळवले आहे. सत्तीगेरी गावातील कर्नाटक पब्लीक स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या सहनाने परीश्रमपूर्वक हे यश मिळवले आहे. तिचे वडील महांतेश रायर हे किराणा मालाचे दुकान चालवतात. मध्यमवर्गीय कुटुंबातील सहनाने कठोर मेहनत घेऊन हे स्पृहणीय यश मिळवले आहे. या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Recent Comments