जनतेच्या कामासाठी लाच मागणारा लाचखोर तलाठी एसीबीच्या सापळ्यात सापडल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील चिंचली गावात घडली आहे होय, रायबाग तालुक्यातील चिंचली गावचा तलाठी जगदीश कित्तूर लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला आहे. आज बुधवारी एसीबीने ही कारवाई केली. गणेकोडी गावच्या सचिन शांतीनाथ शिंदे यांनी तलाठी कित्तूर आपल्याकडे लाच मागत असल्याची तक्रार एसीबीकडे केली होती. त्यानुसार एसीबीने सापळा रचला होता.

सचिन शिंदे यांच्याकडून 1000 रुपये लाच घेताना जगदीश कित्तूर हा एसीबी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. या प्रकरणी तपास सुरु आहे. फिर्यादी शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार एसीबीचे एसपी बी. एस. न्यामगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस उपअधीक्षक करुणाकर शेट्टी यांनी ही तक्रार दाखल करून घेतली होती. , निरगौडा, पोलिस अधीक्षक, लाचलुचपत नियंत्रण दल, उत्तर प्रदेश आणि बेळगाव केली होती. एसीबी पोलीस निरीक्षक निरंजन पाटील यांच्या नेतृत्ताखाली बेळगाव एसीबी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.


Recent Comments