मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या १ हजार टीव्ही चॅनेल्स, आयपिटीव्ही, ओटीटी सेवांचे लौंचिंग, संस्थेच्या केबल सर्व्हिसचा १८ वा वार्षिकोत्सव आणि बेळगावच्या प्रसिद्ध इन न्यूजचा विसावा वार्षिकोत्सव बेळगावात शानदार समारंभात पार पडला.

होय, बेळगावातील संकम हॉटेलच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी झालेल्या शानदार समारंभात मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या १ हजार टीव्ही चॅनेल्स, आयपिटीव्ही, ओटीटी सेवांचे लौंचिंग, संस्थेच्या केबल सर्व्हिसचा १८ वा वार्षिकोत्सव आणि बेळगावच्या प्रसिद्ध वृत्तवाहिनी इन न्यूजचा विसावा वार्षिकोत्सव असा संयुक्त समारंभ उत्साहात पार पडला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावच्या खासदार मंगल अंगडी, आमदार अनिल बेनके, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक नागेश छाब्रिया, प्रमोटर निशा छाब्रिया, सुमुख छाब्रिया, मल्टी ट्रेडींग राधा ग्रुपचे एमडी आदित्य राम असरानी, स्टार डिजिटलच्या सीईओ रिद्धी आदित्य असरानी, नवीन ऍडव्हर्टायझिंगचे संचालक शिरीष पट्टणशेट्टी, मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेजर संतोष पर्वतराव, इन न्यूजचे प्रधान संपादक राजशेखर पाटील, मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सिनियर हेड ऑपरेशन रजनीश तडकोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी दीप प्रज्वलनाने समारंभाचे उदघाटन केले. 
यावेळी बोलताना ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, एकेकाळी केवळ बेंगळुरातुनच केबल चॅनेल्स प्रसारित होत. पण दुसरी राजधानी बेळगावमधून केबल चॅनेल्स प्रसारित करण्याचे साहस नागेश छाब्रिया यांनी दाखवून त्यात यश मिळवले. माझ्या राजकीय वाटचालीत राज्यस्तरीय चॅनेल्सप्रमाणेच बेळगावच्या इन न्यूजचेही योगदान आहे. मेट्रोकास्ट, इन न्यूज आता १ हजार चॅनेल्स मुठीत असलेली संस्था बनली हे प्रशंसनीय आहे असे त्या म्हणाल्या.
मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक नागेश छाब्रिया यांनी यावेळी मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या आजवरच्या वाटचालीची माहिती दिली. संस्थेच्या वाटचालीत योगदान दिलेल्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मेट्रोकास्टतर्फे देण्यात येणाऱ्या नवीन सेवांबाबत माहिती दिली. 
यावेळी बोलताना बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके म्हणाले, मेट्रोकास्टच्या बेंगळुरातील १ हजार चॅनेल्सच्या सेट अपचे उदघाटन मुख्यमंत्री बोम्मई यांनी केले आहे. बेळगावात आणखी एक छाब्रिया म्हणजे राजशेखर पाटील आहेत असे त्यांनी गौरवाने सांगितले. इन न्यूज पाहणे चुकवता येत नाही. ती नशेमध्ये अधिक नशा आहे. माझ्या वाटचालीत इन न्यूजचे योगदान मोठे आहे असे सांगून त्यांनी नागेश छाब्रिया यांचे कौतुक केले. 
कार्यक्रमात बोलताना खा. मंगल अंगडी म्हणाल्या, बेळगावात इन न्यूज वाहिनी उत्तम सेवा देत आहे. या वृत्तवाहिनीचा देशभर विस्तार होवो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. संस्थेच्या वाटचालीत योगदान दिलेल्या सर्वानी उपस्थित राहून समारंभाचा आनंद लुटला.


Recent Comments