Belagavi

बेळगावच्या कराटे स्पोर्ट्स अकादमीला जनरल चॅम्पिअनशिप

Share

 गोव्यातील म्हापसा येथील पेडेम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या युनिक शोटोकॉन कराटे डू असोसिएशन ऑफ इंडियाच्या खुल्या निमंत्रितांच्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटे स्पोर्ट्स अकादमीने जनरल चॅम्पिअनशिप मिळवली

बेळगावच्या कराटे स्पोर्ट्स अकादमीच्या कराटेपटूंनी विविध प्रकारात पदके मिळवून जनरल चॅम्पिअनशिप पटकावली. सिहान राजू जाधव यांच्याहस्ते अकादमीला चषक प्रदान करण्यात आला. या स्पर्धेत प. बंगाल, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व अन्य राज्यातील कराटेपटू सहभागी झाले होते.

या स्पर्धेत बेळगावच्या कराटे स्पोर्ट्स अकादमीच्या कराटेपटूंनी कटास व कुमिटे प्रकारात ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि १३ कांस्य अशी एकूण २२ पदके मिळवली.  या कराटेपटूंमध्ये वडगाव, येळ्ळूर व पिरनवाडी येथील कराटेपटूंचा समावेश आहे. त्यांना सिहान चंदन जोशी व इतरांचे मार्गदर्शन लाभले.

 

 

 

Tags: