अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विजापुरात सरकारी जलतरण तलावाची निर्मिती झाल्याने जलतरणपटूंमध्ये समाधान पसरले आहे. मात्र नियमबाह्य पद्धतीनं या जलतरण तलावाचे व्यवस्थापन होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

होय, कडक उन्हाचा प्रदेश म्हणून विजापूर जिल्ह्याची ओळख आहे. शहरातील कनकदास वसाहतीत हायटेक जलतरण तलाव निर्माण करण्यात आला आहे. त्यासाठी १९९४पासूनच विजापूरच्या आमदारांनी प्रयत्न चालविले होते. जलतरणपटूंची सुद्धा हीच मागणी होती. अखेर गेल्या महिन्यात, १८ एप्रिल रोजी जलतरण तलाव कार्यान्वित झाला. आ. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी स्वतः
पोहून त्याचे उदघाटन केले. मात्र महिन्याच्या आतच तलावावरून वाद निर्माण झाला आहे. नियमबाह्य पद्धतीने उभारलेल्या या तलावात मूलभूत सुविधाच नाहीत. शुल्कावरूनही आक्षेप घेण्यात आला आहे. सामान्य जनतेसाठी १२०० रुपये मासिक शुल्क निर्धारित केले आहे. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना केवळ ६०० रुपये मासिक शुल्क निर्धारित केले आहे. त्यामुळे लोकांमध्ये संताप पसरला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हालाही ६०० रुपये शुल्क आकारावे अशी मागणी करण्यात येत आहे. सिद्धू बिरादार यांनी याबाबत माहिती दिली. 
जलतरण तलाव सुरु झाल्यानंतर सुमारे ८०० जणांनी मासिक पास घेतले आहेत. एका तासाला १०० रुपये इतके अव्वाच्यासव्वा शुल्क आकारले जात आहे. तरीही हौशी जलतरणपटुंचा प्रतिसाद चांगला लाभत आहे. यातून दिवसाकाठी ८ ते १० हजार रुपये महसूल मिळत आहे. एवढे असूनही या ठिकाणी मूलभूत सुविधा देण्यात, स्वच्छता राखण्यात कुचराई करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, पोहण्यासाठी येणार काही लोकच नियम पायदळी तुडवत असल्याचे दिसून आले आहे. पोहण्यास उतरण्याआधी स्नान करून तलावात जाण्याऐवजी थेट त;गावातच उद्या टाकून पोहत आहेत. पोहण्याच्या चड्ड्या ते घालत नाहीत. तर ओळखीतल्या लोकांना मन मानेल तसा मुक्त प्रवेश देण्यात येत असल्याचा आरोप आहे. या बाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सरकारी कर्मचाऱ्यांना शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी उत्तेजन देण्याकरिता शुल्कात सवलत दिल्याचे युवजन सेवा आणि क्रीडाधिकारी एस. जी. लोणी यांनी सांगितले. बाईट
एकंदर विजापुरात नवा सरकारी जलतरण तलाव सामान्य जनतेला भुर्दंड ठरतोय हे मात्र खरे.
विजयकुमार सारवाड, आपली मराठी, विजापूर


Recent Comments