खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात मुलांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आलं होत. यानिमित्त नैसर्गिक आपत्तीत बचाव कार्याचे मुलांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

होय, खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात मुलांसाठी आयोजित उन्हाळी शिबिराच्या शेवटच्या दिवशी मुलांना एचईआरएफ जवानांकडून नैसर्गिक आपत्तीत बचाव कार्याचे मुलांना प्रशिक्षण देण्यात आले. एखाद्या नैसर्गिक आपत्ती प्रसंगी जीव आणि वित्त हानी कशी रोखायची याचे प्रात्यक्षिकांसह मुलांना प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण कसे वाचवायचे, घरात अथवा अन्यत्र आग लागली तर काय करायचे, रस्ते अपघातातील जखमींचे जीव वाचवणे, हार्ट अटॅक आल्यावर, गुदमरल्यावर कृत्रिम श्वास देणे. कोरोनासारख्या संकटात ऑक्सिजन पुरवठा आदी जीवरक्षणाचे तसेच दोरीच्या सहाय्याने झाडावर चढणे आणि उतरणे आदींचे प्रशिक्षण मुलांना या उपक्रमात देण्यात आले.
यावेळी आपत्ती निवारण दलाचे बसवराज हिरेमठ, वैभव चव्हाण, राजू टक्केकर, विनायक खानापुरे, राहुल पाटील आदींनी मुलांना प्रशिक्षण दिले. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांची मुले उपस्थित होती.


Recent Comments