डेंग्यू आणि चिकनगुण्या या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वानी सहकार्य देणे आवश्यक आहे असे आवाहन तालुका ज्येष्ठ आरोग्य सर्वेक्षणाधिकारी नवीनकुमार बायनायक यांनी केले.

हुक्केरीत सोमवारी बेळगाव जिल्हा पंचायत, जिल्हा व तालुका आरोग्य व कुटुंब कल्याण खाते आणि जिल्हा सांसर्गिक रोग नियंत्रणाधिकारी कार्यालयामार्फत आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्यांचा भव्य डेंग्यू जागृती जथा काढण्यात आला. शहरातील विविध मार्गावरून हा जथा काढून डेंग्यू, चिकनगुण्या, मलेरिया, कॉलरा आदी सांसर्गिक रोगांबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी या रोगांच्या नियंत्रणासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक असल्याची जागृती घोषणा देत करण्यात आली. 
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्य सर्वेक्षणाधिकारी नवीनकुमार बायनायक म्हणाले, डेंग्यू, चिकनगुण्या, मलेरिया, कॉलरा आदी रोगांचा प्रसार रोखण्यासाठी जनतेने खबरदारी घेण्याची गरज आहे. रोगाची लक्षणे आढळून येताच जवळच्या सरकारी इस्पितळात रक्त तपासणी करवून घेऊन उपचार घेतले पाहिजेत. 
यावेळी ज्येष्ठ आरोग्य सर्वेक्षणाधिकारी बी. एम. सनदी, एन. आर. ढवळेश्वर, क्षेत्र आरोग्य शिक्षणाधिकारी श्रीमती एम. बी. जकमती, ज्येष्ठ आरोग्य सुरक्षाधिकारी श्रीमती एस. बी. कुलकर्णी यांच्यासह आशा कार्यकर्त्या आदी उपस्थित होते.


Recent Comments