Belagavi

रामदुर्ग तालुक्यातील ओबळापूर ग्रामपंचायतीत घोटाळा

Share

रामदुर्ग तालुक्यातील ओबळापूर ग्राम पंचायतीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप करत बेळगाव जिल्हा पंचायतीसमोर आंदोलन छेडण्यात आले होते.

रामदुर्ग तालुक्यातील ओबळापूर ग्राम पंचायत सचिव, प्रभारी पीडीओ, एम डी बडिगेर यांनी सरकारी अनुदानाचा गैरवापर केल्याचा आरोप राज्य माहिती हक्क आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा संघ आणि विविध संघटनांनी केला आहे. यांच्या माध्यमातून आज बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडत या प्रकरणातील सहभागी आरोपींना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली.

यावेळी राज्य माहिती हक्क आणि सामाजिक कार्यकर्ता संघटनेचे राज्याध्यक्ष रमेश जी बोलताना म्हणाले, जनतेच्या पैशाची लोकप्रतिनिधी लूट करत आहेत. लोकप्रतिनिधींना सहकार्य देणारे अधिकारी देखील यात सहभागी आहे. ओबळापूर ग्राम पंचायतीत देखील असा घोटाळा झाला असून आयएएस अधिकारी लोकप्रतिनिधींच्या हातचे बाहुले झाले असून आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असे अनेक घोटाळके उघडकीस येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शेतकरी नेते चोन्नप्पा पुजारी, रवी सिद्धम्मनावर, राज्य माहिती हक्क आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या संघटनेचे राज्य समिती सदस्य श्रीनिवासगौड पाटील आदी उपस्थित होते.

Tags: