Ramdurg

मुदेनूरच्या शाळा दुरुस्तीला अखेर प्रारंभ; प्रसारमाध्यमांतील वृत्तानंतर प्रशासनाला जाग

Share

 रामदुर्ग तालुक्यातील मुदेनूर गावातील सरकारी उच्च प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी २० लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या वर्षातच कृती योजना आखून दुरुस्तीकाम सुरु करण्यात येईल असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कळविले आहे.   

मुदेनूर गावातील सरकारी शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी जिल्हा पंचायतीकडून १० लाख रुपये तर तालुका पंचायत आणि ग्राम पंचायतीकडून प्रत्येकी ५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तहसीलदार, तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी आदींनी शाळेला भेट देऊन दुरुस्ती कामाचा प्रारंभ करविला आहे. जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच. व्ही. अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून माहिती घेत आहेत असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मुदेनूर गावातील सरकारी शाळेची इमारत मोडकळीस आल्याने ग्रामस्थांनी काल शैक्षणिक वर्षारंभी  शाळेसमोरच तंबू ठोकून वर्ग भरविले होते. याचे वृत्त प्रसारमाध्यमांत आल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यानंतर मुदेनूरच्या या शाळेचे भाग्य उजळले आहे.

 

Tags: