Chikkodi

जनतेच्या विविध समस्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

Share

महसूल त्रुटी, भरपाई विलंब, घरांच्या सर्वेक्षणातील त्रुटी, एबी-आर के रेफरल संदर्भातील तक्रारी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत जनतेच्या अनेक समस्यांबद्दल जागेवरच समस्यांचे निराकरण करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

व्हॉइस : चिकोडी उप विभागाधिकारी कार्यालयात मंगळवारी जनतेच्या मागण्या ऐकून घेतल्या. यासंदर्भात रायबाग तालुक्यातील एका व्यक्तीने जमीन सर्वेक्षणात अडचणी आल्याने उच्च न्यायालयात तक्रार दाखल केल्याची बाब पुढे अली. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना दाखवण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आढावा घेणाऱ्या न्यायाधिकरणात हा निकाल सुरू आहे. न्यायाधिकरणाचा अंतिम आदेश आल्यास जमिनीची नोंदणी तुमच्या नावे केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

चिकोडी तालुक्यातील शिरगाव गावातील कन्नड शाळेत ५०० हुन अधिक विद्यार्थी आहेत. या शाळेत एकूण ५ शिक्षक कार्यरत असून एकाच खोलीत तीन ते चार वर्ग भरविण्यात येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या समस्येवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष पुरवून या सदर शाळेत अतिरिक्त शिक्षक नोंदणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे आश्वासन दिले.

पुरग्रस्तांसंदर्भात इंगळी गावातील अनेक कुटुंबांचे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळले. सर्वेक्षणानंतर अहवालात आलेली नावे नंरतच्या टप्प्यात निदर्शनास आली नसल्याबद्दल त्यांनी माहिती घेतली. २०१९ मध्ये ५०००० भरपाई दिलेल्या कुटुंबांकडून पुन्हा २०२१ मध्ये संपूर्ण घर कोसळल्यामुळे पाच लाखांची नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात देखील काही कुटुंबीयांनी अर्ज सादर केले.

यासर्व समस्यांसंदर्भात ग्राम लेखापालांना त्याचठिकाणी तातडीने बोलावून संयुक्त सर्वेक्षण करूनही काही कुटुंबांना समाविष्ट केले नाही याबाबत सवाल उपस्थित केला. मांजरी गावात पुरामुळे संपूर्ण घराची पडझड झालेल्या घरांची यादी पहिल्या यादीत समाविष्ट करण्यात आली होती. मात्र दुसऱ्या टप्प्यात हि नावे वगळण्यात आल्याने नुकसानग्रस्तांना तक्रार केली. यासंदर्भात पुनर्सर्वेक्षण करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले.

या बैठकीला उपविभागाधिकारी संतोष कामगौड तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी उपनिबंधक, तहसीलदार कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.

Tags: