महाराष्ट्रातील मिरज येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सचिन इस्पितळात येत्या रविवार दि. २२ मे २०२२ रोजी मोफत स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

होय, अपत्यप्राप्ती न होणाऱ्या दांपत्यांसाठी एक खुशखबर आहे. डॉ. सचिन सुगन्नावर यांच्या मिरज येथील प्रसिद्ध सचिन हॉस्पिटलतर्फे येत्या रविवारी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत अपत्यहीन दांपत्यांसाठी मोफत स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. मिरजेतील शिवाजी रोडवरील हॉटेल प्रियदर्शनी जवळील सचिन हॉस्पिटलमध्ये आयोजित या शिबिरात अपत्यहीन दांपत्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तपासणी करून योग्य सल्ला देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इच्छुक दांपत्यांनी अधिक माहितीसाठी डॉ. सचिन, मो. क्र. 9422580842, 9765010834 किंवा डॉ. नेहा मो. क्र. 9421932401 यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.


Recent Comments