Belagavi

काकती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

Share

बेळगाव तालुक्यातील काकती येथील डिव्हाईन हेलपिंग हॅन्ड्स ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

काकती येथे आयोजिण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात काकती येथील युवक, बेळगावमधील संदीप पाटील, पांगुळ गल्ली ग्रुप, एक्स्ट्रीम जिमचे सागर कडोलकर ग्रुप आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

यावेळी कार्यक्रमाला उद्देशून बोलताना मान्यवरांनी रक्तदान शिबिराचे महत्व सांगितले. रक्तदान शिबिरात अधिकाधिक युवकांनी सहभाग घ्यावा, तसेच काकती येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सहभागी झालेले युवक आणि गृपच्यावतीने आखण्यात आलेला समाजाभिमुख उपक्रम याचे कौतुक करण्यात आले. या ग्रुपच्या माध्यमातून असे अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात येतात. याबद्दलदेखील उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

यावेळी उपस्थित पाहुण्यांनी समाजासाठी होत असलेल्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. सर्वानी एकसंघ राहून यशस्वी होता येते, ग्रामस्थांमध्ये संघटितपणा हवा, या संघटनामुळेच चांगले उपक्रम राबविले जाऊ शकतात, अशी प्रतिक्रिया उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केली.

यावेळी ग्राम पंचायत सदस्य, हेलपिंग हॅन्ड्स चे अध्यक्ष गजानन गव्हाणे, सुनीता गव्हाणे, मनोहर शेखरगोळ, प्रवीण रेडेकर, महेश रंगाई, ज्योती गवि, ग्राम पंचायत उपाध्यक्षा वर्षा मुचंडीकर, शिवाजी लोहार, तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कोळेकर, शंकर सुलकुडे. लक्ष्मी सोगलद, रेडक्रॉस संघटनेचे कर्मचारी तसेच के एल इ रुग्णालयाचे कर्मचारी आणि वैद्य उपस्थित होते.

या उपक्रमासाठी समाजसेवक विनायक केसरकर, निकिता लोहार, शिव लोहार, सुधीर पवार, गजानन नायक, पांडुरंग पवार, इमरान मुल्ला, संतोष कांबळे, मोहन मजूकर, भावेश सासूलकर, फारूक मंगसुळी, पवन मुलडकर, आशिष गव्हाणे आदींनी विशेष परिश्रम घेतले, निरंकारी सद्गुरू बाबा हरदेव सिंग जी महाराज, काकती आरोग्य विभागाच्या परिचारिका लक्ष्मी आंबी, सुनंदा, रेड क्रॉसचे बादामी सर, मिसाळे सर, प्रवीण हिरेमठ आदी उपस्थित होते.

Tags: