हुक्केरी तालुक्यातील एलीमुन्नोळी येथे १००८ श्री भगवान नेमिनाथ दिगंबर जैन मंदिरातर्फे श्री पंचपरमेष्ठी विधान महामहोत्सव भक्तिभावाने पार पडला.

होय, एलीमुन्नोळीत गेल्या ५ दिवसांपासून १०८ आचार्य सच्चिदानंद महाराज यांच्या दिव्य सानिध्यात १०८ धैर्यनंदी महाराजांच्या नेतृत्वाखाली १०५ आर्युका माताजी यांच्या पावन उपस्थितीत श्री पंचपरमेष्ठी विधान महामहोत्सव भक्तिभावाने पार पडला. यानिमित्त विविध व्रत, उद्यापने करण्यात आली. 
यावेळी कार्यक्रमात सहभागी होऊन बोलताना माजी आ. संजय पाटील म्हणाले, जैन धर्मात जन्म घेऊन मांसाहार आणि व्यसने करणारे खरे जैन नव्हेत, जीवनात जैन मुनीमहाराजांचा उपदेश आचरणात आणून त्याप्रमाणे वागणारेच खऱ्या अर्थाने जैन आहेत.
यावेळी जैन महाराजांच्या हस्ते बेळगावचे सन्मती कस्तुरी, ‘जितो’चे चेअरमन पुष्पक हनमन्नावर, डॉ. देवेगौडा इमनगौडनवर आदींचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आचार्य सच्चिदानंद महाराज यांचे प्रवचन झाले. 
यावेळी हुक्केरीतील महावीर उद्योग समूहाचे अध्यक्ष महावीर निलजगी, बाहुबली सोलापूरे, रोहित चौगला यांच्यासह एलीमुन्नोळी भगवान नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटीचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments