Belagavi

वकिलांच्या रक्षणासाठी कठोर कायद्याची मागणी

Share

बागलकोट येथे महिला वकिलावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून वकिलांच्या संरक्षणासाठी कायदा जारी करण्याच्या मागणीचे निवेदन बैलहोंगल वकील संघटनेने तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याना दिले.

बागलकोट येथे एका महिला वकिलावर हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेचा निषेध करून बैलहोंगल वकील संघटनेने तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याना निवेदन दिले. समाजात वकिलांना लक्ष्य करण्याच्या घटना वाढल्या आहेत. ऍड. संगीता यांच्यावरील हल्ला हे त्याचेच उदाहरण असून यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, ऍड. संगीता यांना योग्य संरक्षण द्यावे, राज्यातील वकिलांच्या रक्षणासाठी कथित कायदा करून अमलात आणावा अशा मागण्या करण्यात आल्या.

 

Tags: