Belagavi

बेळगावच्या ज्येष्ठ क्रीडापटूंची चमकदार कामगिरी

Share

विद्यानगर स्पोर्ट्स स्कूल, बेंगळूर येथे झालेल्या पॅन इंडिया मास्टर्स गेममध्ये बेळगावच्या ज्येष्ठ क्रीडापटूंनी चमकदार कामगिरी करून तब्बल १२ पदके पटकावली.

होय, तरुणांनाही लाजवेल अशा शारीरिक क्षमतेचे प्रदर्शन घडवत बेळगावच्या वयस्कर क्रीडापटूंनी नुकत्याच विद्यानगर स्पोर्ट्स स्कूल, बेंगळूर येथे झालेल्या पॅन इंडिया मास्टर्स गेममध्ये यश संपादन केले. या क्रीडास्पर्धेत ७० वर्षांवरील गटात उचगावचे सुरेश देवरमणी यांनी ५ किमी चालणे-प्रथम, ५ किमी धावणे-द्वितीय, ८०० मीटर धावणे-द्वितीय तसेच १५०० मीटर धावणे प्रगत द्वितीय क्रमांक पटकावला.

हिंडलगा येथील धोंडीराम शिंदे यांनी ७५ वर्षांवरील गटात २०० मीटर धावणे-प्रथम, १०० मीटर धावणे-द्वितीय, ८०० मीटर धावणे-द्वितीय तसेच १५०० मीटर धावणे-द्वितीय क्रमांक पटकावला.

सुळगा येथील मारुती कणबरकर यांनी ७५ वर्षांवरील गटात भालाफेकीमध्ये प्रथम, १०० मीटर धावणे-तृतीय तसेच ८०० मीटर धावणेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. याबद्दल या वयस्कर क्रीडापटूंचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 

Tags: