बेळगाव मधील टिळकवाडी परिसरातील शिवाजी कॉलनी येथील विविध भागात चोरीच्या प्रकरणात वाढ झाली असून याची धास्ती आता नागरिकांनी घेतली आहे. चोरी करणारी टोळी सध्या सर्वत्र वावरत असून याला आला घालण्याची मागणी शहर पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

रात्रीच्यावेळी घर फोडून घरातील ऐवज लंपास करणारी एक टोळी बेळगावमध्ये पुन्हा कार्यरत झाली असून याची धास्ती आता नागरिकांना लागली आहे. शहर, परिसर आणि उपनगरांमध्ये चोरीच्या प्रकरणात वाढ होत चालली असून शिवाजी कॉलनी, शांतीनगर, गजानन महाराज कॉलनी यासह अनेक परिसरात चोरीच्या घटना घडत आहेत. दारबंद असलेल्या घरावर लक्ष ठेवून अशाच घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. नुकताच असा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
सध्या हि चोरांची टोळी अनेक परिसरात बेफामपणे चोऱ्या करत आहे. या चोरांना कोणतीही भीती नसून बिनधास्तपणे अनेक भागात चोरांचा वावर सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाजी कॉलनी येथील एक घर, शांतीनगर येथील ३ घरे, मोनिका जनरल स्टोअर्स शेजारी असलेले एक घर यासह गजानन महाराज नगर येथे एकाचदिवशी ६ घरे चोरट्यांनी लक्ष्य केली आहेत. हातात शस्त्र घेऊन वाहनातून आलेल्या या चोरांनी बिनधास्तपणे डल्ला मारून पोबारा केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.
११ मे रोजी रात्री २ च्या सुमारास शिवाजी कॉलनी येथील सुरजित राजपूत यांचा घरावर डल्ला मारून १९ तोळे सोने, चांदीचे दागिने यासह १३ लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरट्यांनी पोबारा केल्या आहेत. हा एकाच परिसर नसून अनेक न्यू शिवाजीनगर, शांतीनगर आणि गजानन महाराज नगर येथील घरात देखील चोरी झाल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात टिळकवाडी पोलीस स्थानकात तक्रार देखील नोंदविण्यात आली आहे. ()
यावेळी शहर पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात चोरीच्या प्रकारांना आला घालण्याची मागणी करण्यात आली आहे. वाढत्या चोरीच्या प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरांना जेरबंद करून चोरीला गेलेल्या वस्तू आणि पैसे परत मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत चोरांच्या टोळी मोठ्या प्रमाणात कार्यरत झाल्या असून या भागात दिवसेंदिवस चोरीच्या प्रकारात वाढ होत चालली आहे. पोलीस विभागाने या भागात लक्ष पुरवून चोरांना जेरबंद करण्याची नितांत आवश्यकता आहे.


Recent Comments