Chikkodi

चिकोडी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची व्यथा ,उद्घाटन होऊनदेखील उपचारापासून जनावरे वंचित

Share

निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ या गावात लाखो रुपयांच्या खर्चातून चिकोडी भागात उभं करण्यात येत असलेल्या पशुवैद्यकीय रुग्णालयाची व्यथा केविलवाणी झाली आहे. पशु वैद्यकीय सेवेसाठी उभारण्यात आलेल्या रुग्णालयाचे उद्घाटन होऊनदेखील अद्याप सेवाच सुरु न झाल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने खाजगी रुग्णालयात जनावरांचे उपचार करून घ्यावे लागत आहेत.

सदर रुग्णालयाचे उद्घाटन न झाल्याने अनेक शेतकरी विवंचनेत आहेत. या रुग्णालयाची इमारत अवैज्ञानिक पद्धतीने उभारण्यात आल्याने हे रुग्णालय सुरूच झाले नाही. या रुग्णालयाची इमारत लाखो रुपयांच्या खर्चातून उभी करण्यात आली आहे.

आर आय डी एफ २४ अंतर्गत ४० लाख रुपयांच्या खर्चातून या रुग्णालयाची इमारत उभी करण्यात आली आहे. मात्र या रुग्णालयाचे प्रवेश द्वार एका खाजगी साईटच्या दिशेने असल्याने साईट मालकाने रुग्णालय प्रवेशद्वारासमोरच तारेचे कुंपण उभे केल्याने या रुग्णालयात उपचार सेवा सुरु करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिवाय या रुग्णालयाचे उद्घाटन देखील गेल्या सहा महिन्यांपूर्वी निपाणी येथील आमदार शशिकला जोल्ले यांच्याहस्ते पार पडले आहे.

जुन्या पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत संपूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर आहे. या रुग्णालयात केवळ औषधे वितरण करण्यात येत आहेत. नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालय इमारतीतही उपचार मिळत नसल्याचे शेतकऱ्यांना जनावरांचे उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. शिवाय खाजगी पशुवैद्यकीय रुग्णालयांचे दर परवडणारे नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड देखील बसत आहे. यामुळे शासकीय रुग्णालयात लवकरात लवकर उपचार सुरु करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Tags: