हुक्केरी, निप्पाणी आणि चिक्कोडी तालुक्यातील सरकारी आणि अनुदानीत शाळांमध्ये २०२२–२३ची अक्षर दासोह आणि क्षीरभाग्य योजना आज पुन्हा सुरु करण्यात आली.

हुक्केरीतील गुरूशांतेश्वर जनकल्याण प्रतिष्ठानच्या अक्षर दासोह केंद्रातर्फे आजपासून पुन्हा शाळा सुरु झाल्याबद्दल मुलांना शेवयाची खीर आणि बिसिबेळेभात तसेच दूध देऊन हुक्केरी तालुका पंचायतीचे मुख्याधिकारी उमेश सिदनाळ यांनी अक्षर दासोह योजनेला चालना दिली. यावेळी हुक्केरी गट शिक्षणाधिकारी मोहन दंडीन यांनी दीप प्रज्वलन केले. चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याचे अक्षर दासोह योजना शिक्षणाधिकारी एस. एम. नदाफ यांनी माध्यान्ह आहार वाहतूक करणाऱ्या वाहनांना हिरवे निशाण दाखवले.
निपाणी गट शिक्षणाधिकारी आर. एम. मठद यांनी अन्नपूर्णेश्वरी देवीची पूजा केली. हुक्केरी अक्षर दासोह योजनेचे सहायक संचालक एस. एस. हिरेमठ यांनी कर्मचाऱ्यांना योजनेचे नियम समजावून सांगितले. यावेळी गुरूशांतेश्वर जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी उपस्थित होते. यावेळी कटकोळ एम. चंदरगी हिरेमठाचे रेणुक गडदेश्वर देवरु आणि संपतकुमार शास्त्री यांनी विशेष पूजा केली. 
यावेळी बोलताना तापं कार्यकारी अधिकारी उमेश सिदनाळ म्हणाले, गुरूशांतेश्वर जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे अक्षर दासोह योजना काटेकोरपणे राबविण्यात येत आहे याचे आम्हाला समाधान आहे.
हुक्केरी गट शिक्षणाधिकारी मोहन दंडीन यांनी अक्षर दासोह माध्यान्ह आहार बनवताना अतिशय स्वच्छता राखण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. हुक्केरी तालुक्यातील ४० हजार मुलांसाठी अक्षर दासोह योजना आज कार्यान्वित करण्यात आली. त्याचप्रमाणे चिक्कोडी तालुक्यातील नाईंग्लज उपकेंद्रात २५ हजार मुलांसाठी ही योजना सुरु झाली. गेली २ वर्षे कोविड महामारीमुळे अक्षर दासोह योजना बंद पडली होती. ती आता पुन्हा सुरु झाली आहे.


Recent Comments