Hukkeri

हुक्केरीत माजी विध्यार्थ्यांकडून गुरुवंदना

Share

देव थांबला नाही तरी शिष्यासाठी गुरू थांबतो, अशी म्हण आहे. तसे केल्याबद्दल आपण गुरूंचे आभार मानावे तितके कमी आहेत. यासाठी हुक्केरी येथील माजी विद्यार्थ्यांनी गुरूंचे पाय धुवून सदिच्छा दाखवली आहे.

हुक्केरी येथील श्री काडसिद्धेश्वर हायस्कूलच्या १९९४-९५च्या तुकडीच्या एसएसएलसीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना विद्यादान केलेल्या गुरूंचे पाय धुवून आदर व्यक्त करत गुरुवंदना केली. शिक्षकांशी हितगुज करत, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून बालपणीच्या आठवणी जागविल्या.

हुक्केरीतील एस. के. हायस्कूलच्या बालभवनात हा गुरुवंदना कार्यक्रम पार पडला. शिवानंद पट्टणशेट्टी, संतोष देशपांडे, सिद्धू पोतदार, मल्लय्या मठपती, गिरीश मत्तिकोप्प, प्रशांत बोजे, संतोष हेगडे, सलीम मुलतानी, शशिधर दयाम्नी, दीपक करनिंग आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठो परीश्रम घेतले.

 

 

Tags: