खानापूर तालुक्यातील लिंगनमठ गावात विश्वगुरू बसवेश्वरांच्या नवीन पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे ग्रामस्थांसोबतच मुस्लिम बांधवांनी स्वागत केले.

होय, खानापूर तालुक्यातील लिंगनमठ गावात विश्वगुरू बसवेश्वरांच्या नवीन पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. तत्पूर्वी पुतळ्याची गावातून उत्साहात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
ग्रामस्थांसोबतच गावातील मुस्लिम बांधवांनी या मिरवणुकीचे भव्य स्वागत केले. बसवेश्वर पुतळ्याची मिरवणूक गावातील मशिदीसमोर येताच लिंगनमठ ग्राम पंचायतीचे अध्यक्ष मुस्लिम युवा नेते कासीम हट्टीहोळी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम नागरिकांनी बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचे स्वागत केले. यावेळी ‘विश्वगुरू बसवेश्वर महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. गावातील सगळे मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते.


Recent Comments