हुक्केरी तालुक्यातील होसूर हे गाव सर्वधर्म समभावाचे केंद्र बनले आहे असे उद्गार क्यारगुड्डचे अभिनव मंजुनाथ स्वामीजी यांनी काढले.

होसूर गावातील नूतन श्री महालक्ष्मी मंदिराचे लोकार्पण कोण्णूर मरडीमठाचे पवाडेश्वर महास्वामी आणि निर्वानट्टीचे विद्यानंद स्वामी यांच्या सानिध्यात फीत कापून करण्यात आले.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिनव मंजुनाथ स्वामीजी म्हणाले, होसूर गाव नवनवे उपक्रम राबवून सर्वधर्म समभावाचे केंद्र बनले आहे. सर्वधर्मीयांच्या सहभागाने गावात श्री महालक्षीमी देवीचे सुंदर मंदिर उभारून एक आदर्श निर्माण केला आहे असे सांगितले.
यावेळी देवस्थानच्या आवारात रोपे लावून उद्योजक पवन कत्ती यांनी देवस्थान परिसर स्वच्छ राखण्याचे आवाहन भक्तांना केले.
त्यानंतर झालेल्या समारंभात मंदिर उभारणीसाठी सहकार्य, आर्थिक मदत केलेल्या दानशूरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी मंत्री शशिकांत नाईक म्हणाले, होसूर महालक्ष्मी मंदिरासाठी प्रभाकर कोरे तसेच मंत्री उमेश कत्ती यांच्या अनुदानातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने सुमारे १ कोटी निधी जमवण्यात आला. त्यातून देवीचे दगडातील सुंदर मंदिर साकारण्यात आले आहे असे सांगून यासाठी सहकार्य दिलेल्यांचे आभार मानले.

यावेळी मातोश्री अन्नपूर्णा, भाजप नेते परगौडा पाटील, हणमंत इनामदार, लगमण्णा मलाडी, बाहुबली नागनुरी, भीमप्पा रामगोनहट्टी, मंदिर समिती सदस्य बाबागौद पाटील, विठ्ठल रामगोनहट्टी, कल्लप्पा अक्कतंगेरहाळ, बसवानी कुंबार, यल्लाप्पा पाटील, शिवानंद मुगळखोड आदी उपस्थित होते.


Recent Comments