बेळगावात रविवारी गुरुवंदना सोहळ्यानिमित्त सकल मराठा समाजने काढलेल्या मिरवणुकीत दक्षिण मतदार संघातील मुस्लिम जमातकडून पाणीवाटप करून जातीय सलोख्याचे दर्शन घडविण्यात आले.

कपिलेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी उद्यानापासून आदर्श विद्यामंदिरापर्यंत स्वामीजींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर शहापूरातील बॅ.नाथ पै सर्कलमध्ये

दक्षिण मुस्लिम जमातच्यावतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीत सहभागी मराठा समाजबांधवांची पाण्याची तहान भागवून मुस्लिम जमातने जातीय सलोख्याचे संदेश दिला.
अमजद मोमीन, अशपाक घोरी, अब्दुल बागलकोटी, राहुल केसरकर यांच्यासह दक्षिण मतदार संघ मुस्लिम जमातीच्या सदस्यांनी या उपक्रमात भाग घेतला.


Recent Comments