लग्न झाल्यावर सामान्यपणे नवे जोडपे कुलदेवाच्या दर्शनाला जाते असा प्रघात आहे. मात्र चिक्कोडीतील दोन नवपरिणीत जोडप्यांनी धर्मवीर संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून नवजीवनाला सुरवात करून वेगळी परंपरा सुरु केली. याबाबत सादर आहे एक विशेष वृत्त…

होय, कुठल्याही जाती-धर्मात लग्न झाले की आधी कुलदेवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्याचा प्रघात आहे. मात्र धर्मासाठी बलिदान दिलेल्या धर्मवीर संभाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून चिकोडीतील २ जोडप्यांनी दांपत्य जीवनाला प्रारंभ केला आहे. या शूरवीरांप्रमाणेच शूर पुत्र किंवा संस्कारमूर्ती जिजाऊंप्रमाणेच संस्कारी कन्या आपल्या पोटी जन्माला येऊ देत असा वर या जोडप्यांनी मागितला. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे तितकेच शूर पुत्र धर्मवीर संभाजी महाराजांची ३६५वी जयंती १४ मे रोजी साजरी करण्यात आली. त्यावेळी देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेले छत्रपती शिवराय आणि त्यांचे धाडसी, वीर पुत्र धर्मवीर संभाजी महाराज हेच आमचे दैवत असे मानून रोहित आणि राहुल सावंत या बंधूंनी त्यांना लग्न लागलेल्या दिवशीच नमन केले. रोहित यांचा विवाह स्नेहल यांच्याशी तर राहुल यांचा विवाह अक्षता यांच्याशी झाला. सात फेरे घेतल्यानंतर या दोन्ही दांपत्यांनी आपल्या आदर्श दैवतांना अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

धर्मवीर संभाजी महाराजांनी प्राणांचे बलिदान देऊन हिंदुत्व वाचविल्यामुळेच आज जगात भारत देश आणि संस्कृती वाचली असे मानणाऱ्या या दोन्ही दांपत्यांनी बेळगाव जिल्ह्यातील चोक्कोडी शहरात अनोख्या पद्धतीने विवाह करून वाहवा मिळवली आहे. लग्नानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून आदराने नमन करून अभिवादन केले आहे.
इतकेच नाही तर या नवदांपत्यांनी हातात भगवे ध्वज घेऊन ‘हिंदुत्वाचा विजय असो’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या उपक्रमाचे चिक्कोडी परिसरात कौतुक करण्यात येत आहे.


Recent Comments