Hukkeri

दड्डीतील रामलिंगेश्वर देवस्थानात चोरी; दानपेटी फोडून ६० हजार लंपास

Share

चोरटयांनी आता देवादिकांनाही लक्ष्य केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचीच प्रचिती देणारी चोरीची घटना हुक्केरी तालुक्यातील दड्डी येथील देवस्थानात घडली आहे.

होय, दड्डी गावच्या बाहेर असणाऱ्या श्री रामलिंगेश्वर देवस्थानाचे रात्रीच्या वेळी कुलूप तोडून दानपेटी लांबवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. देवस्थानाचे कुलूप तोडून दानपेटी लांबवल्याच्या चोरीच्या घटनेचे संपूर्ण चित्रीकरण येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. ही दानपेटी देवस्थानाबाहेरील शेतात नेऊन फोडून त्यातील रक्कम, दान लुटून चोरटयांनी पेटी तशीच टाकून पोबारा केला आहे. या दानपेटीत भक्तांनी दान दिलेले सुमारे ६०,००० रुपये होते. ते चोरटयांनी पळवले आहेत. त्याशिवाय देवस्थानातील साऊंड सिस्टिमदेखील पळवली पण २०० मीटर अंतरावरील शेतात टाकून दिली आहे अशी माहिती देवस्थान कमिटीचे राहुल मुंगरवाडी यांनी दिली. या जागृत देवस्थानात झालेल्या चोरीच्या घटनेने दड्डी परिसरात खळबळ माजली आहे.

घटनास्थळी यमकनमर्डी पोलीस स्थानकाचे इन्स्पेक्टर रमेश छायागोळ यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाटी जाळे विणले आहे.

Tags: