खानापूर–नंदगड मार्गावर हेब्बाळनजीक एका वळणावर मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात २ युवक ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी झाला.

होय, नंदगडहून खानापूरकडे एका दुचाकीवरून तिघेजण येत असताना चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी झाडाला धडकली. त्यामुळे तिघेही युवक उडून पडून गंभीर जखमी झाले. यात २५ वर्षीय सुरेश नागप्पा तोपिनकट्टी, रा. गणेबैल हा युवक जागीच ठार झाला.
तर नंदगडच्या रायपूर गल्लीचा रहिवासी गणेश विठ्ठल बामणे या २२ वर्षीय युवकाचा इस्पितळात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. परशुराम महादेव गुरव हा १५ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरु आहेत. नंदगड पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.


Recent Comments