तीक्ष्ण हत्याराने भोसकून युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना हुबळी तालुक्यातील अदरगुंची गावात घडली आहे.
: ३५ वर्षीय शंभूलिंग कमडोळी असे निर्घृण खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्याराने भोसकून त्याचा खून करून पोबारा केला आहे. शंभूलिंग कमडोळी याचे सुमारे वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु पूर्ववैमनस्यातून त्याचा खून झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Recent Comments