Belagavi

जिल्हा जंगम पुजारी संघटनेच्या वैदिक संस्कार शिबिराचा समारोप

Share

 बेळगाव जिल्हा जंगम पुजारी संघटनेतर्फे बेळगाव शहरात आयोजित वैदिक संस्कार शिबिराचा समारोप सोहळा शनिवारी पार पडला.

होय, बेळगाव येथील माणिकबाग येथील कमलपुष्प मंगल कार्यालयात आज शनिवारी बेळगाव जिल्हा जंगम पुजारी संघटनेतर्फे आयोजित वैदिक संस्कार शिबिराचा समारोप सोहळा पार पडला. या शिबिरात  ६५ मुलांनी सहभाग घेतला.

संगोळ्ळी हिरेमठ संस्थानचे गुरुलिंग शिवाचार्य स्वामीजी तसेच सत्तीगेरी हिरेमठ संस्थानचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, तारिहाळ मठाचे अडिवेश देवरु यांनी या कार्यक्रमाचे सानिध्य निभावले.    यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, जर तुम्ही संस्कृत, वेद आणि ज्योतिषशास्त्राचे श्रद्धेने व  परिश्रमपूर्वक अध्ययन केले तर तुमची गणना पंच पिठाधिपतींमध्ये होईल. परंतु त्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील.

गुरु आणि आई-वडिलांना वंदन करून कष्ट घेऊन शिकाल तर तुमच्यापैकी कोणीही पंच पिठाधिपती होऊ शकतो, तीच आमची इच्छा आहे असे सांगितले.  यावेळी चंद्रशेखर सवदी, शंकर हिरेमठ, विरुपाक्षय्या  निरलगीमठ यांच्यासह बेळगाव जिल्हा जंगम पुजारी संघटनेचे अध्यक्ष, सचिव व सदस्य उपस्थित होते.

 

 

 

Tags: